टाटा ग्रुप लवकरच भारतामध्ये आयफोन मॅन्युफॅक्चरिंगची सुरूवात करणार आहे. यासाठी टाटा ग्रुप कडून दक्षिण भारतात बेंगळूरू च्या जवळ प्लांट खरेदी करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. टाटा कडून तायवानच्या विस्ट्रॉन ग्रुपचा प्लांट खरेदी करण्याचा विचार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भारतात टाटा ग्रुप विस्ट्रॉम सोबत मिळून आयफोन बनवण्याची योजना करत आहे. असे झाल्यास टाटा ही भारतामध्ये आयफोन निर्माण करणारी पहिली कंपनी ठरणार आहे.
पहा ट्वीट
iPhone Production in India: Tata-Run Apple Phone Plant To Boost India’s Prospects As Manufacturing Hub, Say Reports #iPhone #Apple #TataGroup @TataCompanies @Apple https://t.co/Dy2flQZHd4
— LatestLY (@latestly) January 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)