इन्स्टाग्राम डाऊन झाल्याची तक्रार जगभरातील अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. अर्थात काही युजर्सचे इन्स्टाग्राम व्यवस्थीत सक्रीय आहे. मात्र काहींना लॉग इन करताना तांत्रिक समस्या येतअसल्याचे वापरकर्त्यांनी म्हटले आहे. X (पुर्वीचे Twitter) वर अनेक युजर्सनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमध्ये इन्स्टाग्राम आऊटेजची समस्या असल्याचे म्हटले आहे. डाउनडिटेक्टर, क्राउड-सोर्स्ड आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मनेही वापरकर्त्यांनी ही तक्रार केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, Downdetector नुसार सुमारे 21% वापरकर्त्यांनी नोंदवले आहे की त्यांना Instagram ॲप ऍक्सेस करताना समस्या येत आहेत. सुमारे 69% लोकांनी लॉगिन समस्या नोंदवल्या आहेत आणि उर्वरित लोकांनी 'सर्व्हर कनेक्शन समस्या' नोंदवल्या आहेत. आउटेज, अहवालानुसार, काल उशिरा सुरू झाला आणि वापरकर्त्यांना अजूनही Instagram सह समस्यांचा सामना करावा लागत आहे.

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)