Google Pixel Production in India: Google त्याच्या पिक्सेल स्मार्टफोनचे काही उत्पादन भारतात नेण्यासंदर्भात विचार करत आहे. त्यासाठी गूगल पुरवठादारांचा शोध घेत आहे, असे विविध प्रसारमाध्यमांनी वृत्तसंस्थेच्या वृत्ताचा दाखलादेत म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला ब्लूमबर्गने म्हटले आहे की, Alphabet Inc. चे Google भारतातील पुरवठादारांना त्याचे Pixel स्मार्टफोन एकात्रिित आण्याचा विचार करत आहे. त्यांना Apple Inc. च्या प्लेबुककडून चीनपेक्षाही अधिक वैविध्य त्यात आणायचे असल्यामुळे गूगल हा विचार करत असल्याचे समजते.
दरम्यान, ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार असेही समजते की, Google ने स्थानिक Lava International Ltd. आणि Dixon Technologies India Ltd. तसेच Foxconn टेक्नॉलॉजी ग्रुपचे भारतीय युनिट Bharat FIH या कंपन्यांशी चर्चा सुरु केली आहे. सध्यातरी या या संपूर्ण चर्चेत गुप्तता बाळगण्यात येत असल्याने त्यावर कोणीही अधिकृत भाष्य करणे टाळले असल्याची चर्चा आहे.
ट्विट
From #Bloomberg | #Google seeks suppliers to move some #Pixel production to #India pic.twitter.com/HAQB50z5xR
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) June 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)