आयपीएल 2024 चा 38 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईच्या संघाला सुरुवातीलाच राजस्थानला बांधून ठेवले. मुंबईचे पहिले चार विकेट स्वस्तात बाद झाल्यावर तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांनी मुंबईचा डाव संभाळला. नेहल 24 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 49 धावा केल्या. दरम्यान, त्याने तिलकसह 99 धावांची भागीदारीही केली. त्यामुळे मुंबईला 150 धावांचा टप्पाही पार करता आला. तर तिलक वर्माने 45 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावा केल्या. या सामन्यात संदिप शर्माने शानदार गोलंदाजी करत 4 षटकांत 18 धावांदेत 5 विकेट्स घेतल्या. मुंबईला 20 षटकात 9 बाद 179 धावा करता आल्या.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)