Vinesh Phogat Disqualification: आज भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिकमधून बाहेर पडली. विनेशने मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये एकापाठोपाठ अनेक सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र आज अंतिम सामन्याआधी तिचे वजन थोडे जास्त असल्याचे दिसून आले व त्यानंतर ती अपात्र ठरली. यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी वजन जास्त असल्याने कुस्तीपटू विनेश फोगट अपात्र ठरली. मात्र तिच्यासोबत संपूर्ण टीम असताना असे कसे घडले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बारामतीच्या खासदार आणि एनसीपी-एसपी नेत्या सुप्रिया सुळे यांनीही विनेश फोगटसोबत पाठविलेले कोच, डायटीशन, फिजिकल ट्रेनर्स सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात, ‘लोकसभेत क्रीडामंत्र्यांनी विनेश फोगटच्या अपात्रतेबाबत निवेदन केले. आम्ही या निवेदनाचा निषेध करतो. त्यांच्या निवेदनात पदक हुकल्याबाबतच्या दुःखाचा लवलेशही नव्हता. प्रश्न उपस्थित होतो की विनेश सोबत पाठविलेले कोच, डायटीशन, फिजिकल ट्रेनर्स हे सगळं घडेपर्यंत काय करत होते? एवढा मोठा लवाजमा सोबत असतानाही हा प्रकार घडावा हे अतिशय दुःखद आहे. आमची मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. आम्ही सर्वजण या प्रकरणामुळे खुप दुःखी आणि निराश आहोत. ही सपोर्टींग टीमचा चूक आहे हे स्पष्ट आहे.’ (हेही वाचा; Rahul Gandhi On Vinesh Phogat Disqualification: 'विनेश फोगाट ला तांत्रिक कारणावरून अपात्र ठरवण्यात आल्याची बाब दुर्दैवी'; राहुल गांधी यांची पोस्ट)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)