विश्वविजेत्या पहेलवानाला हरवून विनेश फोगाटची अंतिम फेरीत झालेली एन्ट्री देशाची मान उंचावणारी होती मात्र आता तांत्रिक कारणावरून अपात्र ठरवण्यात आल्याची बाब दुर्दैवी असल्याची पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी भारतीय ऑलंपिक संघ या निर्णयाविरूद्ध दाद मागत तिला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विनेश हिंमत हारण्यांमधील नाही ती पुन्हा मैदानात पूर्ण जोशाने उतरेल असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. आजही देश तुझी ताकद बनून उभा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Vinesh Phogat's Disqualification: विनेश फोगाट च्या अपात्रतेनंतर PM Modi यांनी IOA President PT Usha यांच्याशी साधला संपर्क; पूर्ण मदतीचं केलं आवाहन.

पहा पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)