पॅरिस ऑलंपिक मध्ये भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणार्‍या विनेश फोगाटला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवल्यानंतर भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेशच्या चिकाटीचं कौतुक करत तिच्या अपात्रतेवरून दु:ख व्यक्त केलं आहे. मात्र यानंतर त्यांनी पॅरिस मध्ये IOA President PT Usha यांच्याशी संपर्क साधला आहे. पीटी उषा यांना विनेशला सारी मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच आता तिच्यासमोर असलेल्या पर्यायांचा विचार करण्यास सांगितले आहे. तिला मदत होणार असेल तर या अपात्रतेबद्दल कठोर निषेध नोंदवण्याच्या देखील त्यांनी सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. Vinesh Phogat Hospitalised: विनेश फोगट रुग्णालयात दाखल, डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध झाल्याची माहिती.

नरेंद्र मोदींनी साधला   IOA President PT Usha सोबत संपर्क

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)