Vinesh Phogat Hospitalised: भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला होता. या सामन्यात विनेश फोगटने 5-0 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. मात्र,अनुज्ञेय वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम असल्याने तीला 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले, हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (हेही वाचा: PM Modi on Vinesh Phogat Disqualification: 'तू भारताचा अभिमान, प्रत्येकासाठी प्रेरणा'; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनेश फोगटासाठी एक्सवर पोस्ट)
पोस्ट पहा
#Breaking | Vinesh Phogat hospitalised due to dehydration. @nabilajamal_ #Wrestling #VineshPhogat #Olympics pic.twitter.com/Dx5eVBMyNt
— IndiaToday (@IndiaToday) August 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)