P Chidambaram Health Update: असह्य उकाड्याने साबरमती आश्रमात बेशुद्ध पडले पी चिदंबरम; प्रकृती स्थिर असल्याची X पोस्ट द्वारा माहिती

अति उष्णतेमुळे मला डिहायड्रेशनचा त्रास झाला. सर्व चाचण्या नॉर्मल आहेत. मी आता पूर्णपणे बरा आहे.' असं म्हणत चिदंबरम यांनी हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

P Chidambaram Health Update: असह्य उकाड्याने साबरमती आश्रमात बेशुद्ध पडले पी चिदंबरम; प्रकृती स्थिर असल्याची X पोस्ट द्वारा माहिती
P Chidambaram | File Image | (Photo Credits: PTI)

आज (8 एप्रिल) मंगळवारी अहमदाबादमधील साबरमती आश्रमात उष्णतेमुळे काँग्रेस नेते पी. चिदंबरम बेशुद्ध पडले . चिदंबरम यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. चिदंबरम काँग्रेस कार्यकारिणी (CWC) बैठक आणि अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) अधिवेशनासाठी अहमदाबादमध्ये आले होते. पी चिदंबरम यांनी X वर पोस्ट करत 'अति उष्णतेमुळे मला डिहायड्रेशनचा त्रास झाला. सर्व चाचण्या नॉर्मल आहेत. मी आता पूर्णपणे बरा आहे.' असं म्हणत त्यांनी हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

पी चिदंबरम यांचे हेल्थ अपडेट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2025 11:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).