जेरेमी लालरिनुंगाने (Jeremy Lalrinnunga) 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मीराबाई चानूनंतर जेरेमीने वेटलिफ्टिंगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. भारताच्या या स्टार खेळाडूने एकूण 300 किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये 140 किलो वजन उचलले, ज्यामध्ये त्याने खेळांचा विक्रमही केला. त्याचवेळी जेरेमीने क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात त्याला 165 किलो वजन उचलायचे होते, पण तसे घडले नाही. बर्मिंगहॅममध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो भारतातील पहिला पुरुष खेळाडू आहे. आतापर्यंत भारताला पाच पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये प्राप्त झाली आहेत.
#CommonwealthGames2022 | Indian weightlifter Jeremy Lalrinnunga wins the Gold medal in Men's 67kg weightlifting. India's second gold in Birmingham
— ANI (@ANI) July 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)