BWF World Tour Finals: उपांत्य फेरीत PV Sindhu हीचा संघर्षपूर्ण विजय, जपानच्या Akane Yamaguchi हिच्यावर विजय मिळवून फायनलमध्ये केला प्रवेश
भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने शनिवारी बाली येथे झालेल्या उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीचा 21-15, 15-21, 21-19 असा पराभव करून BWF वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विद्यमान विश्वविजेती आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेतीचा सामना रविवारी होणार्या शिखर लढतीत दक्षिण कोरियाच्या An Seyoung शी होणार आहे.
बाली (Bali) येथे शनिवारी झालेल्या BWF वर्ल्ड टूर फायनलच्या उपांत्य फेरीत दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने (PV Sindhu) जपानच्या अकाने यामागुचीचा (Akane Yamaguchi) 70 मिनिटांत 21-15, 15-21, 21-19 असा पराभव केला. सिंधूने स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली असून तिने 2018 मध्ये विजेतेपद पटकावले होते आणि ही कामगिरी करणारी एकमेव भारतीय ठरली होती.
Reigning world champion @Pvsindhu1 🇮🇳 takes on Akane Yamaguchi 🇯🇵 in a semifinals showdown in Bali.#BWFWorldTour #BaliFinals2021 pic.twitter.com/PIZNp7qvrh
— BWF (@bwfmedia) December 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2021 05:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

