Droupadi Murmu and Saina Nehwal Badminton Play: राष्ट्रपती भवनाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(Droupadi Murmu  Plays Badminton) बॅडमिंटन खेळत असल्याचा व्हिडिओ हा शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये द्रौपदी मुर्मू आपल्या बॅडमिंटन स्किल्स दाखवत आहेत. द्रौपदी मुर्मू आणि सायना नेहवाल(Saina Nehwal) या दोघींमधला सामना पाहण्यासाठी युवा खेळाडूंनी आणि कार्यालयीन अधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा 23 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. द्रौपदी मुर्मू यांच्या अप्रतिम खेळाडू प्रवृत्तीला पाहून प्रेक्षक त्यांच्यावर टाळ्यांचा वर्षाव करताना दिसून येत आहेत.  (हेही वाचा: रितेश देशमुखच्या मुलांनी घेतला सुनील गावसकरांचा ऑटोग्राफ; अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ)

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)