PV Sindhu Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत दोन पदके जिंकली आहेत. क्रीडा महाकुंभाचा आज पाचवा दिवस आहे. आजही देशाला पदकाची आशा आहे. महिला नेमबाज मनू भाकरने भारताला दोन्ही पदके जिंकून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सलग दुसरा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने इस्टोनियाच्या क्रिस्टीन कुबाचा 21-5, 21-10 असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. हा सामना 34 मिनिटे चालला. सिंधूने पहिला गेम 14 मिनिटांत तर दुसरा गेम 19 मिनिटांत जिंकला. आता सिंधूसाठी पुढील वाटचाल अवघड असेल. दरम्यान, ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी दुसरे पदक मिळाले. पाचव्या दिवशीही भारतीयांना नेमबाजीत पदकाची आशा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)