IND vs ZIM 4th T20I: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघ यांच्यात आज पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. तसेच, चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकताच भारत मालिका जिंकेल. तर, दुसरीकडे, झिम्बाब्वेला पुन्हा एकदा टीम इंडियाला चकित करण्याची संधी मिळणार आहे. तत्तपुर्वी, टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 152 धावा केल्या. झिम्बाब्वेसाठी कर्णधार सिकंदर रझाने 48 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून खलील अहमदने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 153 धावा करायच्या आहेत.
4TH T20I. WICKET! 19.6: Clive Madande 7(5) ct Rinku Singh b Khaleel Ahmed, Zimbabwe 152/7 https://t.co/AaZlvFYFmF #ZIMvIND
— BCCI (@BCCI) July 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)