IND vs AFG 2nd T20I Live Score Update: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium, Indore) खेळवला जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून आतापर्यंतच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही (Virat Kohli) संघात पुनरागमन केले आहे, अशा स्थितीत करोडो चाहत्यांची नजर कोहलीवर आहे. तत्तपुर्वी, भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतासमोर 173 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्तानसाठी स्फोटक फलंदाज गुलबदिन नायबने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 173 धावा करायच्या आहेत. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वालने झंझावाती अर्धशतक ठोकले आहे.
A quick-fire FIFTY by @ybj_19 off just 27 deliveries.
This is his fourth in T20Is.
Live - https://t.co/YswzeUSqkf #INDvAFG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/BXKB0DThzy
— BCCI (@BCCI) January 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)