महिला प्रीमियर लीगसाठी (WPL 2023) संपूर्ण तयारी करण्यात आली असून, आज संध्याकाळी रंगारंग कार्यक्रमाने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये अनेक भारतीय कलाकार आपला परफॉर्मन्स देणार आहेत. त्याआधी डब्ल्यूपीएलने त्याचे गाणे रिलीज केले आहे जे इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. आज संध्याकाळी 6.25 वाजता भव्य उद्घाटन सोहळा सुरू होणार होता. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला बॉलिवूड स्टार्स कियारा अडवाणी, क्रिती सॅनन आणि गायक एपी धिल्लॉन उपस्थित राहणार आहेत. गायक शंकर महादेवन महिला प्रीमियर लीगचे अधिकृत गाणे सादर करतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)