IND vs AUS 2nd Test भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 चा (Border-Gavaskar Trophy 2023) दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शमीने वॉर्नरला 15 धावांवर पायचीत केले. त्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला कसोटी फलंदाज मार्नस लॅबुशेन आला ज्याने 18 धावा केल्या आणि धावसंख्या 91 वर नेली. त्यानंतर नंबर 1 लाबुशेन आणि नंतर नंबर 2 स्टीव्ह स्मिथ देखील रविचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) पुढे पायचीत झाले. यासह रविचंद्रन अश्विनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (कसोटी क्रिकेट आणि सर्व रेड बॉल क्रिकेट फॉरमॅट) 700 बळी पूर्ण केले. त्याचवेळी या डावात शून्यावर बाद झालेल्या स्मिथच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथला दोनदा शून्यावर बाद करणारा अश्विन हा एकमेव गोलंदाज ठरला आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धही 99 बळी घेतले आहेत. त्याने आणखी एक विकेट घेतल्यास तो कांगारू संघाविरुद्ध 100 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल. त्याच्याआधी फक्त अनिल कुंबळे (111 विकेट) हे करू शकले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)