IND vs AFG 1st T20: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीला खेळवला जाईल. भारतीय संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका असेल. रोहित शर्मा दीर्घ कालावधीनंतर टी-20 मध्ये संघाची कमान सांभाळणार आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचेही संघात पुनरागमन झाले आहे. पण तो पहिला टी-20 सामना खेळणार नाही. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. राहुल द्रविडने यावेळी एक अपडेट दिले की, विराट कोहली पहिल्या सामन्याच्या प्लेइंग 11 चा भाग असणार नाही. त्याने सांगितले की, वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली पहिल्या टी-20 सामन्यातून बाहेर पडला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की विराट कोहलीने 2022 टी-20 विश्वचषकादरम्यान टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. (हे देखील वाचा: Rohit Sharma New Record: कर्णधार रोहित शर्मा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ, जगातील सर्व टी-20 कर्णधार राहतील मागे)
India head coach Rahul Dravid says Virat Kohli will miss the first T20I against Afghanistan in Mohali due to personal reasons.#INDvsAFG pic.twitter.com/FJ61emN83W
— Press Trust of India (@PTI_News) January 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)