Rohit Sharma New Record: कर्णधार रोहित शर्मा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ, जगातील सर्व टी-20 कर्णधार राहतील मागे
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

IND vs AFG T20 Series: टीम इंडियाला 2024 मधील पहिली होम सीरिज अफगाणिस्तानविरुद्ध खेळायची आहे. 11 जानेवारीपासून तीन टी-20 सामने सुरू होणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत, दुसरा इंदूरमध्ये आणि तिसरा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. या मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा देखील (Rohit Sharma) टीम इंडियाचा भाग आहेत. या मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा मोठ्या विश्वविक्रमाची बरोबरी करू शकतो. (हे देखील वाचा: Fan Touches KL Rahul's Feet: चाहत्याने केएल राहुलच्या पायाला केला स्पर्श, स्टार फलंदाजाच्या प्रतिक्रियेने जिंकली मन (Watch Video)

कर्णधार रोहित विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ 

रोहित शर्माचे 14 महिन्यांनंतर भारतीय टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान त्याने टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. पण 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी तो पुन्हा एकदा संघात परतला आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडे आता टी-20 मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार बनण्याचा विश्वविक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे.

4 सामने जिंकताच सर्व कर्णधारांना मागे सोडेल

रोहित शर्मा देखील टी-20 फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होण्याच्या जवळ आहे. जर रोहित अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर तो भारताचा सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार बनेल. हा विक्रम सध्या एमएस धोनीच्या नावावर आहे. एमएस धोनीने 72 पैकी 41 सामने जिंकले होते. त्याचबरोबर ही मालिका स्वीप करून तो टी-20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी करेल. जर त्याने टी-20 विश्वचषकाचे नेतृत्व केले तर त्याला हा विश्वविक्रम मोडण्याची संधी असेल.

टी-20 मध्ये सर्वाधिक सामने जिंकलेल्या कर्णधारांची यादी

असगर अफगाण- अफगाणिस्तान- 42

बाबर आझम- पाकिस्तान- 42

इऑन मॉर्गन- इंग्लंड- 42

ब्रायन मसाबा- युगांडा- 42

एमएस धोनी- भारत- 41

अॅरॉन फिंच- ऑस्ट्रेलिया- 40

रोहित शर्मा- भारत- 39