T20 विश्वचषकात (T20 WC 2022) आज भारत आणि बांगलादेश (IND vs BNG) यांच्यात अतिशय रोमांचक सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने 5 धावांनी विजय मिळवला. सामन्याचा निर्णय डकवर्थ लुईस नियमानुसार झाला. मात्र, भारतीय फलंदाजीदरम्यान असे काही घडले की दिनेश कार्तिक आनंदी दिसत नव्हता. भारतीय फलंदाजीदरम्यान विराटने 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जोरदार कव्हर ड्राइव्ह केला. मात्र, त्यावेळी क्षेत्ररक्षक मिडऑफला उभा होता. कोहलीचा फटका क्षेत्ररक्षकाने अडवला आणि त्याने चेंडू नॉन स्ट्राईकच्या दिशेने फेकला. त्यावेळी धावा काढण्यासाठी पुढे आलेला दिनेश धावबाद झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)