Virat Kohli New Record IPL: विराट कोहलीने रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
एका मैदानावर 3000 हून अधिक धावा करणारा कोहली आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.
CSK vs RCB: आयपीएलच्या 17 व्या (IPL 2024) मोसमात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) बॅटने एक मोठा विक्रम रचताना दिसत आहे. एका मैदानावर 3000 हून अधिक धावा करणारा कोहली आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2024 चा 69 वा लीग सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये आरसीबी संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यात कोहलीने चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकार ठोकत आयपीएलच्या तीन हजार धावांचा आकडा पूर्ण केला. (हे देखील वाचा: Rohit Sharma Viral Video: 'एका ऑडिओने माझी वाट लावली', रोहित शर्मा हात जोडून असं का म्हणाला? पाहा व्हिडिओ)
The @RCBTweets openers start in style!
Virat Kohli also completes 3000 runs at the Chinnaswamy Stadium 🏟️
Follow the Match ▶️ https://t.co/7RQR7B2jpC#TATAIPL | #RCBvCSK | @imVkohli pic.twitter.com/JFTY7OBsvn
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2024 08:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

