आयपीएल 2023 च्या (IPL 2023) 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) बॅटने कहर केला. वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळल्या जात असलेल्या लीग टप्प्यातील 22व्या सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) या मोसमातील दुसरे शतक ठोकले. व्यंकटेशने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. 50 चेंडूत 104 धावा करून तो बाद झाला. या मोसमातील हे दुसरे शतक आहे. हैदराबाद संघाच्या हॅरी ब्रूकने या मोसमातील पहिले शतक झळकावले. व्यंकटेश अय्यरने 49 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. केकेआरसाठी शतक झळकावणारा तो ब्रेंडन मॅक्क्युलमनंतरचा दुसरा खेळाडू ठरला. मॅक्युलमने आयपीएलच्या पहिल्या सत्रातील पहिल्याच सामन्यात 73 चेंडूत 158 धावांची खेळी केली होती. यानंतर केकेआरसाठी कोणत्याही खेळाडूला शतक झळकावता आले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)