Ladki Bahin Yojana | (Photo credit: archived, edited, representative image)

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) पुढे सुरु राहणार की, बंद होणार याची चर्चा सुरु असतानाच आता राज्यातील जवळपास चार हजारहून अधिक महिलांनी या योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभावरील दावा सोडला (Womens Withdrawn Applications Ladki Bahin Yojana) आहे. बहुतांश महिलांनी हा दावा स्वखुशीने सोडला असला तरी, त्यामागे सरकारद्वारे केली जाणारी संभाव्य वसुलीची भीती असल्याचे समजते. अर्थात राज्य सरकारने योजनेद्वारे दिलेले पैसे लाभार्थ्यांद्वारे वसूल करण्याचा कोणताही विचार स्पष्टपणे बोलून दाखवला नाही. महिला व बालविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगतात की, या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यावर लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्याच्या भीतीने हा दावा सोडला जात आहे. दरम्यान, सरकारचा असा विचार नाही. मात्र, त्यांनी मिळवलेली रक्कम ‘थेट हस्तांतर योजने’शी संलग्न खात्यांमधून वसूल करण्यात येईल, असेही हे अधिकारी सांगतात.

अर्ज पडताळणी आणि निकष

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची निवड आणि संख्या निश्चित करण्यासाठी राज्य सरकारचा महिला व बालविभाग आता अर्जांना निकष लावून पडताळणी करणार आहे. ही प्रक्रिया अद्याप सुरु झाली नाही. तरीदेखील पडताळणीपूर्वीच अनेक महिलांनी या योजनेचे भरुन दिलेले अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवरील सरकारी कार्यालयांध्ये 'या योजनेतून आपले नाव वगळावे', अशी मागणी करणारे अर्ज दाखल होऊ लागले आहेत, असे विभागाचे वरीष्ट अधिकारी सांगत आहेत. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, लाखो महिलांना अर्ज अपात्र होण्याची भीती; सत्ताधारी भाऊराया काय करणार?)

'पैसे परत घेण्याचा विचार नाही'

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माहिती देताना सांगितले की, लाभार्थी महिलांना दिलेले पैसे परत घेण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही. मात्र, लाडकी बहीण योजना लाभासाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करुन निकष लावून गरजू आणि पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल याकडे लक्ष दिले जाणार आहे. उर्वरीत महिलांना या लाभातून वगळले जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्यापूर्वीच राज्यभरातील सुमारे चाह हजारांहून अधिक महिलांनी 'योजना नको' असे म्हणत आपला दावा स्वखुशीने नाकारल्याचे समजते. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना खरोखरच होणार बंद? लाडक्या बहिणांना दंड?)

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालीन राज्य सरकारने ही योजना जेव्हा सुरु केली. योजना सुरु केली तेव्हा सरकारने महिलांच्या अर्जाची कोणतीही पडताळणी, निकष न ठरवता सरकट लाभ दिला. त्यामुळे राज्याच्या तीजोरीवर प्रचंड भार पडला. असे असले तरी, विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्य सरकारला या योजनेचा प्रचंड फायदा झाला. ज्यामुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले. आता मत्र सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची फेरपडताळणी करणार आहे. ज्यामुळे राज्यातील जवळपास चार लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण अर्जांपैकी चार लाख बहीणी नावडत्या होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.