ENG vs AUS T20 WC 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या 17 व्या (T20 World Cup 2024) सामन्यात आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) आमनेसामने येणार आहेत. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ आजचा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. अशा परिस्थितीत, चाहत्यांना एक रोमांचक हाय-व्होल्टेज ॲक्शन बघायला मिळू शकते. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात कडवी टक्कर आहे. दोन्ही संघांमध्ये 23 सामने झाले असून त्यात इंग्लंडने 11 तर ऑस्ट्रेलियाने 10 जिंकले आहेत. टी-20 विश्वचषकातही इंग्लंडचा वरचष्मा आहे, जिथे दोन्ही संघांमधील सामना 2-1 असा आहे. दरम्यान, हा सामना हॉटस्टार ॲपवर थेट प्रक्षेपित केला जाईल आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा आनंद घेता येईल.
2 champion teams, 1 age old rivalry 🔥
The #T20WorldCup2022 champions #England face off against the ICC Men's ODI World Cup champions in an epic showdown! 🤯
Which powerhouse will secure the win? 👀#AUSvENG | TODAY 10:30 PM | #T20WorldCupOnStar pic.twitter.com/J9Lll8MHrT
— Star Sports (@StarSportsIndia) June 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)