जमैका अँटी-डोपिंग आयोगाच्या (जेएडीसीओ) निर्णयानुसार, वेस्ट इंडिजचा फलंदाज जॉन कॅम्पबेलवर (John Campbell) डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तीन सदस्यीय स्वतंत्र पॅनेलने शुक्रवारच्या 18-पानांच्या निर्णयात कॅम्पबेलवर नमुना संकलन सादर करण्यास टाळाटाळ, नकार किंवा अयशस्वी झाल्याचा आरोप केला. वेस्ट इंडिजसाठी 20 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळलेल्या कॅम्पबेलवर यापूर्वी एप्रिलमध्ये किंग्स्टन येथील त्याच्या घरी रक्ताचा नमुना देण्यास नकार दिल्याचा JADCO ने आरोप केला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)