IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील (IPL 2023) 'इम्पॅक्ट प्लेयर' (Impact Player) नियमानुसार, संघ कोणत्याही एका खेळाडूला पर्याय म्हणून मैदानात उतरवू शकतील. नाणेफेकीच्या वेळी संघांना प्लेइंग इलेव्हनसह त्यांच्या चार पर्यायी खेळाडूंची घोषणा करावी लागेल. या चार खेळाडूंपैकी संघ कोणत्याही एका खेळाडूला 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून मैदानावर पाठवू शकेल. बदली खेळाडूला सामन्याच्या 14व्या षटकापर्यंतच मैदानात उतरवता येईल. त्यानंतर त्याला काही अर्थ उरणार नाही. बीसीसीआयने (BCCI) यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हा प्रयत्न केला होता, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसते आणि बीसीसीआय पुढील हंगामात आयपीएल घेण्यासाठी खूप उत्सुक आहे.
Time for a New season 😃
Time for a New rule 😎
How big an "impact" will the substitute player have this edition of the #TATAIPL 🤔 pic.twitter.com/19mNntUcUW
— IndianPremierLeague (@IPL) December 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)