India A vs India B Cricket Team Match Scorecard Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी 2024 चा पहिला सामना भारत अ विरुद्ध भारत ब यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत ब संघाने 31.3 षटकांत सहा गडी गमावून 150 धावा केल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदर 6 धावा करून खेळत आहे. तत्पूर्वी, भारत अ संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत ब संघाची सुरुवात काही खास नव्हती. भारत ब संघाचा पहिला डाव 116 षटकात 321 धावांवर संपुष्टात आला. भारत ब संघाकडून मुशीर खानने सर्वाधिक 181 धावांची खेळी केली. तर भारत अ संघाकडून आकाश दीपने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारत अ संघाचा पहिला डाव 72.4 षटकांत 231 धावांवरच आटोपला. भारत ब संघाकडून सलामीवीर मयंक अग्रवालने सर्वाधिक 36 धावा केल्या. भारत अ संघाकडून नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)