गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे (Team India) मुंबईत (Mumabi) जंगी स्वागत करण्यात आले. नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली आणि खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनेही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केल्यावर हा संपूर्ण कार्यक्रम संपला. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठा सन्मान करण्यात येणार आहे. त्याआधी विश्वविजेते 'वर्षा' वर पोहचले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबेच यांच  मुख्यमंत्र्यांकडून सत्कार करण्यात आला. त्यानंतर विधानभवन परिसरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांचे आगमन झाले.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)