Mohammed Siraj Government Jobs Telangana: मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा (Team India) भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत जेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Telangana CM A Revanth Reddy) यांनी नुकतीच मोहम्मद सिराजची भेट घेऊन त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि सिराजला सरकारी नोकरी आणि जमीन देण्याची घोषणा केली आहे. यावेळी सिराज यांनी मुख्यमंत्र्यांना टीम इंडियाची जर्सी भेट दिली. सिराज आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनही उपस्थित होता. तेलंगणाच्या सीएमओने या बैठकीची फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.
पाहा फोटो आणि व्हिडिओ
అంతర్జాతీయ క్రికెట్లో భారత దేశానికి, మన తెలంగాణ రాష్ట్రానికి గొప్ప పేరు ప్రఖ్యాతులు తెచ్చిన అల్ రౌండ్ క్రికెటర్ @mdsirajofficial గారిని ముఖ్యమంత్రి @revanth_anumula గారు అభినందించారు. #T20WorldCup ను గెలుచుకున్న అనంతరం హైదరాబాద్కు వచ్చిన్న సిరాజ్ ముఖ్యమంత్రిగారిని ఆయన… pic.twitter.com/hDf6s2ezr0
— Telangana CMO (@TelanganaCMO) July 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)