KL Rahul-Athiya Shetty Wedding: टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल 23 जानेवारीला बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्नगाठ बांधू शकतो. बीसीसीआयने केएल राहुलला सुट्टी दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-20 मालिकेसाठी केएल राहुलचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. शनिवारी बीसीसीआयने सांगितले की, राहुलला वैयक्तिक कारणांमुळे विश्रांती देण्यात आली आहे. या ब्रेकनंतर आता राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचा कार्यक्रम तीन दिवसांचा असेल. पहिल्या दोन दिवसात हळद, मेंदी आणि संगीताचे विधी होतील. आणि तिसऱ्या दिवशी दोघेही सात फेऱ्या घेतील. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्यावर हे लग्न होऊ शकते. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि एमएस धोनी त्यांच्या कुटुंबियांसोबत केएल राहुलच्या लग्नात पोहोचू शकतात.
Ever since Athiya Shetty and cricketer KL Rahul have made their relationship official, reports of their marriage have been doing the rounds for a while now. Wedding festivities of couple might begin from January 21 to 23.
#AthiyaShetty #KLRahulhttps://t.co/inQlmnsZju pic.twitter.com/YnoCx2opYR
— FilmiBeat (@filmibeat) January 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)