भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज मंगळवारी (22 नोव्हेंबर) खेळवला गेला. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा डाव 19.4 षटकात 160 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने नऊ षटकांत चार गडी गमावून 75 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाने व्यत्यय आणला. डीएलएस पार स्कोअर अंतर्गत, भारताने आवश्यक 75 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत पंचांनी सामना संपवण्याचा निर्णय घेतला आणि सामना टाय घोषित करण्यात आला. आणि भारतीय संघाने 1-0 ने मालिका जिंकली.
पहा फोटो
Winners are grinners 😎🏆#TeamIndia #NZvIND pic.twitter.com/vs7orTI1l3
— BCCI (@BCCI) November 22, 2022
Done and dusted 🏆🤙 Way to go #TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/P2vkdawRJp
— hardik pandya (@hardikpandya7) November 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)