Mohammed Siraj: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आज म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी तेलंगणा पोलिसात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर मोहम्मद सिराज यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सिराजने अनेक मोठ्या प्रसंगी टीम इंडियासाठी घातक कामगिरी केली आहे. मोहम्मद सिराज यांच्यासोबत खासदार एम अनिल कुमार यादव, खासदार आणि टीजीएमआरईआईएसचे अध्यक्ष मोहम्मद फहिमुद्दीन कुरेशी देखील होते. मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी यापूर्वीच सिराज यांना प्रतिष्ठित गट-1 सरकारी पद मिळेल, अशी घोषणा केली होती. मोहम्मद सिराज आज कर्तव्यावर रुजू झाल्यावर हे आश्वासन पूर्ण झाले. भविष्यातील तारे घडवण्याच्या योजनांसह राज्यातील क्रीडा आणि खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या राज्य सरकारच्या वचनबद्धतेवर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)