T20 World Cup 2024 Teaser: क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण करण्यासाठी, आयसीसीने गुरुवारी आगामी T20 विश्वचषक 2024 चा एक अनोखा टीझर जारी केला. या टीझरमध्ये भारतीय स्टार्स हार्दिक पंड्या, शुभमन गिल, दक्षिण आफ्रिकेचा महान क्विंटन डी कॉक, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह, आफ्रिदी, वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड आदींचा समावेश आहे. येत्या 1 ते 29 जून दरम्यान युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा अमेरिकेत तीन आणि कॅरिबियनमध्ये सहा ठिकाणी खेळवली जाईल. टीझरमध्ये आयसीसी T20 विश्वचषक 2024 च्या लोगोचे अनावरण करण्यात आले आहे आणि 1 ते 29 जून या तारखांची घोषणा करण्यात आली आहे, ज्याची टॅगलाइन 'आऊट ऑफ द वर्ल्ड' आहे. (हेही वाचा: IPL 2024 Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर; 22 मार्चला होणार पहिला सामना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)