इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 46 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण 30 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघ 15-15 विजयांसह बरोबरीत आहेत. या हंगामात याआधी हे दोन्ही संघ आमनेसामने असताना पंजाब किंग्जने विजय मिळवला होता. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावून 214 धावा केल्या. पंजाब किंग्जसाठी लियाम लिव्हिंगस्टोनने 82 धावांची नाबाद खेळी खेळली. मुंबई इंडियन्सकडून पियुष चावलाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला 20 षटकात 215 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने आपले अर्धशतक पुर्ण केले आहे. मुंबई इंडियन्स संघाचा स्कोअर 138/2.
FIFTY!@surya_14kumar races to his half-century off just 23 deliveries 👏👏
Live - https://t.co/IPLsfnImuP #TATAIPL #PBKSvMI #IPL2023 pic.twitter.com/SKAqR9O8E2
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)