Mumbai vs Lucknow: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 45 वा सामना रविवार म्हणजे 27 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला आहे. दरम्यान, मुंबईचा सुपरस्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये 4000 धावा करणारा दुसरा सर्वात जलद खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सच्या 88/2 धावसंख्येवर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर एक षटकार मारला आणि त्यानंतर सलग दोन चौकार मारले. याशिवाय त्याने आवेश खानलाही सीमा ओलांडून पाठवले. अशाप्रकारे त्याने आयपीएलमध्ये आपले 4000 धावा पूर्ण केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)