Delhi Capitals vs Mumbai Indians, TATA IPL 2025 63rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 63 वा सामना आज म्हणजेच 21 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या हंगामात मुंबईची धुरा हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे. तर, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, परंतु दिल्लीसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्ली कॅपिटल्स आज मुंबईला हरवू शकले नाही, तर या हंगामातील त्यांचा प्रवास इथेच संपेल आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित करेल. दरम्यान, दिल्लीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

मुंबईत सूर्यकुमार-नमन धीरचे आले वादळ

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 180 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 73 धावांची नाबाद खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत सात चौकार आणि चार षटकार मारले. सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त रायन रिकेल्टनने 25 तर नमन धीर स्फोटक 24 धावा केल्या.

मुकेश कुमारने घेतल्या सर्वाधिक दोन विकेट

दुसरीकडे, स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. मुकेश कुमार व्यतिरिक्त मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव आणि दुष्मंथा चमीराने विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकांत 181 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)