Mumbai Beat Delhi IPL 2025: मुंबईचा दिल्लीवर मोठा विजय, एमआय प्लेऑफसाठी पात्र; दिल्ली कॅपिटल्स बाहेर

मुंबईने दिल्लीसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत सर्वाधिक 73 धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीला सामन्यात पुनरागमन करू दिले नाही आणि डीसीला 121 धावांवर गुंडाळले. या विजयासह मुंबईने प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित केले आहे. तर दिल्लीचा संघ बाहेर पडला आहे.

Mumbai Beat Delhi IPL 2025: मुंबईचा दिल्लीवर मोठा विजय, एमआय प्लेऑफसाठी पात्र; दिल्ली कॅपिटल्स बाहेर
MI (Photo Credit- X)

Delhi Capitals vs Mumbai Indians, TATA IPL 2025 63rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 63 वा सामना बुधवार म्हणजेच 21 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला. मुंबईने दिल्लीसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत सर्वाधिक 73 धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीला सामन्यात पुनरागमन करू दिले नाही आणि डीसीला 121 धावांवर गुंडाळले. या विजयासह मुंबईने प्लेऑफमध्ये त्यांचे चौथे स्थान निश्चित केले आहे. तर दिल्लीचा संघ बाहेर पडला आहे.

मुंबईत सूर्यकुमार-नमन धीरचे आले वादळ

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 180 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 73 धावांची नाबाद खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत सात चौकार आणि चार षटकार मारले. सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त रायन रिकेल्टनने 25 तर नमन धीरने स्फोटक 24 धावा केल्या. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. मुकेश कुमार व्यतिरिक्त मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव आणि दुष्मंथा चमीराने विकेट घेतल्या.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाचे तीन फलंदाज केवळ 27 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ 18.2 षटकांत फक्त 121 धावा करून सर्वबाद झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून समीर रिझवीने 39 धावांची सर्वाधि खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, समीर रिझवीने 35 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकार मारला. समीर रिझवी व्यतिरिक्त विप्रराज निगमने 20 धावा केल्या.

त्याच वेळी, दीपक चहरने मुंबई इंडियन्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मिशेल सँटनर व्यतिरिक्त दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).