ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांचं काल 20 मे दिवशी पुण्यात निधन झाले. आज त्यांचं पार्थिव ‘आयुका’ संस्थेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आज त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आहे. दरम्यान नारळीकर यांचे विश्व निर्मितीचे रहस्य उलगडण्यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. आज नारळीकरांवर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. जयंत नारळीकर यांच्या अंत्यदर्शनाला पोहचले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
#Pune | ‘आयुका’ संस्थेत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेतलं.#JayantNarlikar pic.twitter.com/FDImVixKPz
— AIR News Pune (@airnews_pune) May 21, 2025
जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. #जयंतनारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी डॉक्टर नारळीकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. pic.twitter.com/sdGFnL9Dwb— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) May 21, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)