अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा 1 मे 2026 ला होणार रीलीज होणार आहे. आज त्याची घोषणा झाली आहे. या सिनेमात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारत आहे सोबतच तो सिनेमाच्या दिग्दर्शनाची देखील जबाबदारी सांभाळत आहे. हा सिनेमा मराठी सोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषेतही रीलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख दिसणार आहेत. नक्की वाचा: Riteish Deshmukh चा 'राजा शिवाजी' सिनेमातील डांसर सहकलाकार सातारा मध्ये नदीपात्रात बुडला; दोन दिवसांनी सापडला मृतदेह.
रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' महाराष्ट्र दिनी येणार
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)