SRH vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 50 व्या (IPL 2024) सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी (SRH vs RR) आमनेसामने आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहे. पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थानचा संघ जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी, सनरायझर्स संघ गेल्या दोन सामन्यांमध्ये रुळावरून घसरला आहे. त्यामुळे या सामन्यात बरेच काही पणाला लागणार आहे. पराभवामुळे त्यांचा पुढचा मार्ग कठीण होईल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 201 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून स्टार फलंदाज नितीश रेड्डी याने सर्वाधिक धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकात 202 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालनंतर रियान परागनेही अवघ्या 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. राजस्थान रॉयल्स संघाचा स्कोर 132/2.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)