SRH vs KKR 3rd IPL Match 2021: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आज आयपीएलचा (IPL) तिसरा सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर पहिले फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 187 धावांचा डोंगर उभारला. सामन्यादरम्यान 30 वर्षीय केकेआरचा फलंदाज राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) 12 वी धाव घेताच आयपीएलमध्ये आपले 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. राहुलने सामन्यात 29 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार खेचत 53 धावांची महत्तवपूर्ण खेळी केली. आयपीएलच्या 46 व्या सामन्यात राहुल त्रिपाठीने ही कामगिरी असून आयपीएलमध्ये 1,00 धावांचा टप्पा गाठणारा तो 74वा फलंदाज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)