भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी क्रिकेट वनडे विश्वचषकाच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आमनेसामने आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. हे मैदान फलंदाजांसाठी नेहमीच कठीण असते. या मैदानावर धावा काढणे कधीच सोपे नव्हते. त्यामुळेच या मैदानावर आतापर्यंत झालेल्या 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघांना केवळ दोनदाच ३०० धावांचा टप्पा गाठता आला आहे. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 428 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डर डुसेनने सर्वाधिक 108 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला 50 षटकांत 429 धावा करायच्या आहेत.
Rassie - 108 (110).
Aiden Markram - 106 (54).
Quinton De Kock - 100 (84).
South Africa 428/5 - the highest ever score and the fastest ever individual hundred in World Cup history. Insane stuff from Proteas!!! pic.twitter.com/M71OOMJETA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)