भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला कसोटी मालिका आपल्या नावावर करुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असुन भारताचा स्कोर 36/0 आहे तर टीम इंडिया ऑस्ट्रेलियापेक्षा 444 धावांनी मागे आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल क्रिजवर आहेत. तत्तपुर्वी टाॅस जिंकून फलंदांजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडून ख्वाजा-ग्रीनने शतक झळकावले तर आर अश्विनने सहा बळी घेतले. आज ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सवर 255 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन क्रीजवर उपस्थित होते. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली. कॅमेरून ग्रीनने बाद होण्यापूर्वी कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)