Close
Advertisement
 
बुधवार, मे 14, 2025
ताज्या बातम्या
17 minutes ago

Gold Rate Today: सोन्याच्या दरांमध्ये आज पुन्हा घसरण; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर

22 एप्रिल रोजी सोन्याचा दर 1 लाखाच्या टप्प्यापार पोहोचला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात आता तोळ्यामागे 20 दिवसांमध्ये सुमारे 5500 रुपयांची घसरण झाली आहे.

महाराष्ट्र Dipali Nevarekar | May 14, 2025 02:34 PM IST
A+
A-
Gold vs Silver Prices | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सोन्याच्या दरांमध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेली वाढ आता हळू हळू घसरत आहे.ही बाब लग्नसराई मध्ये सोनं खरेदी करणार्‍यांसाठी दिलासादायक आहे. भारतामध्ये आज 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये घसरण दिसून आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. सोबतच जागतिक पातळीवर अमेरिका-चीन व्यापार तणाव कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सोन्याच्या किमतीही कमी झाल्या आहेत. 22 एप्रिल रोजी सोन्याचा दर 1 लाखाच्या टप्प्यापार पोहोचला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात आता तोळ्यामागे 20 दिवसांमध्ये सुमारे 5500 रुपयांची घसरण झाली आहे.

भारतामध्ये आज सोन्याचा भाव काय?

goodreturns च्या रिपोर्टनुसार,आज 24 कॅरेट सोन्याचा दर 540 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम साठी 96,660 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 500 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम साठी 88,050 रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे, आज 18 कॅरेट सोन्याचा दरही 410 रुपयांनी कमी झाला आहे आणि सध्या तो 72,040 रुपये झाला आहे.

भारतामध्ये आज चांदीचा दर काय?

गेल्या दोन दिवसांत सलग दोन वेळा घसरण झाल्यानंतर आज भारतात चांदीचे दर स्थिर आहेत. सध्या भारतात 1 किलो चांदी 97,900 रुपये आहे. तर 100 ग्रॅम चांदीची किंमत 9,790 रुपये आहे. Buy Gold Abroad in Cheapest Prices: यंदाच्या वर्षी सर्वात स्वस्त दरात सोने खरेदी करण्यासाठी अव्वल 5 देश, घ्या जाणून. 

सोन्या-चांदीचे आजचे Retail Selling Rates

 

भारतामध्ये 1  एप्रिल 2023 पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत. त्यामुळे तुमची फसवणूक होत नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. प्रामुख्याने दागिने घडवताना 23 कॅरेट मध्ये बनवले जातात तर 24 कॅरेट सोनं हे गुंतवणूकीच्या दृष्टीने घेतलं जातं.


Show Full Article Share Now