
Gold Market 2025: सोने जगभरातील सर्वात मौल्यवान आणि मागणी असलेल्या धातूंपैकी एक आहे. ज्याचे गुंतवणूक, संस्कृती आणि दागिन्यांमध्ये खूप महत्त्व आहे. त्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार त्यास नेहमीच प्राधान्य देतात. सहाजिकच त्याचे भाव नेहमीच गगणाला भिडलेलेअसतात. अशातच कर, आयात शुल्क आणि बाजारातील मागणी यासारख्या घटकांमुळे वेगवेगळ्या देशांमध्ये सोन्याच्या किमती चढ-उतार होतात. तुलनेत त्यात उतार कमी आणि वधारच अधिक असतो. अशा वेळी तुम्ही जर स्वस्तात सोने खरेदी (Gold Prices) करु इच्छित असाल तर ही माहिती आपल्यासाठी खास असू शकते. जाणून घ्या यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सर्वात कमी किमतीमध्ये सोने खरेदी करण्यासाठी कणते 5 देश ठरु शकतात अव्वल.
भारतामध्ये सोन्याचा संबंद संस्कृतीशी
भारतीय खरेदीदारांसाठी, सोने हा धातू गुंतवणूक आणि संस्कृतीशी जोडलेला आहे. त्यामुळे सण, उत्सव आणि लग्नससमारंभाच्या काळात त्याची अधिक खरेदी होते. त्यामुळे खरेदीच्या काळात सोने दर गगनाला भिडतात. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत असलेला सोन्याचा उच्च दर अनेकदा गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना परदेशात स्वस्त सोने खरेदी करण्याचे ठिकाण शोधण्यास प्रवृत्त करतो. फेब्रुवारी 2025 पर्यंत, भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 85,370 रुपये होती, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 78, 250 रुपये इतकी होती. (हेही वाचा, Today Gold Price: सोन्याच्या दराने गाठली नवी पातळी! 10 ग्रॅम सोन्याची किंमत 91,000; जाणून घ्या आजचा भाव)
संभाव्य खरेदीदारांना मदत करण्यासाठी, काही अभ्यासू मंडळींनी भारतापेक्षा सोने लक्षणीयरीत्या स्वस्त असलेल्या टॉप 5 देशांची यादी तयार केली आहे. ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
2025 मध्ये सर्वात स्वस्त सोने देणारे टॉप 5 देश
1. यूएसए
- 24 कॅरेट सोन्याची किंमत: प्रति 10 ग्रॅम 72,280 रुपये
- 22 कॅरेट सोन्याची किंमत: प्रति 10 ग्रॅम 67,920 रुपये
2. ऑस्ट्रेलिया
- 24 कॅरेट सोन्याची किंमत: प्रति 10 ग्रॅम 73,580 रुपये
- 22 कॅरेट सोन्याची किंमत: प्रति 10 ग्रॅम 67,900 रुपये
3. सिंगापूर
24 हजार सोन्याची किंमत: प्रति 10 ग्रॅम 77,110 रुपये
22 हजार सोन्याची किंमत: प्रति 10 ग्रॅम 69,390 रुपये
4. स्वित्झर्लंड
- 24 हजार सोन्याची किंमत: प्रति 10 ग्रॅम 78,660 रुपये
- 22 हजार सोन्याची किंमत: प्रति 10 ग्रॅम 71,960 रुपये
5. इंडोनेशिया
- 24 हजार सोन्याची किंमत: प्रति 10 ग्रॅम 78,860 रुपये
- 22 हजार सोन्याची किंमत: प्रति 10 ग्रॅम 73,530 रुपये
दरम्यान, वर उल्लेख केलेल्या टॉप 5 देशांव्यतिरिक्त, दुबई, तुर्की, हाँगकाँग, मलावी आणि कोलंबिया देखील स्पर्धात्मक सोन्याच्या किमती देतात, ज्यामुळे ते सोने खरेदीदारांसाठी आकर्षक ठिकाणे बनतात. सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या किंवा दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी, स्वस्त बाजारपेठेतून खरेदी केल्याने लक्षणीय बचत होऊ शकते. दरम्यान, खरेदी करण्यापूर्वी आयात नियम, सत्यता आणि पुनर्विक्री मूल्य यासारख्या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे.