बीसीसीआयने (BCCI) ने बुधवारी भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी 18 सदस्यीय कसोटी संघ जाहीर केला. रेड-बॉल सामने 17 डिसेंबर रोजी सुरू होणार होते, परंतु कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे ते पुढे ढकलले गेले. सलामीची कसोटी आता 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कवर सुरू होईल. जोहान्सबर्गमधील वाँडरर्स स्टेडियम आणि केपटाऊनमधील न्यूलँड्स हे उर्वरित दोन सामन्यांचे यजमान असतील.

असा असेल संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मो. शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मो. सिराज.

स्टँडबाय खेळाडू: नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अरझान नागवासवाला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)