इस्रोचे चांद्रयान-3 मोहीम 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्ने, अभिमान आणि विश्वास आहेत. चांद्रयान-3 प्रक्षेपणामुळे आपल्या सर्वांचे हृदय अभिमानाने फुलले आहे. आमच्या सर्व शास्त्रज्ञांचे त्यांच्या अथक प्रयत्नांबद्दल अभिनंदन. सर्व भारतीयांसाठी संस्मरणीय दिवस. जय हिंद!, असे म्हणत क्रीकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी चांद्रयान मोहिमेचे कौतुक केले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-3 मोहीम शुक्रवारी, 14जुलै रोजी दुपारी 2.30वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केली. चांद्रयान-2 चे अनुसरण करून शास्त्रज्ञांनी चंद्राच्या कक्षेत पोहोचणे, लँडरचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट-लँडिंग करणे आणि चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी लँडरमधून बाहेर पडणारे रोव्हर यासह विविध क्षमतांचे प्रदर्शन करण्याचे ध्येय ठेवले आहे. ध्येपूर्तीसाठी ही मोहीम यशस्वी होईल, असा ठाम विश्वास इस्त्रोने व्यक्त केला आहे. (हेही वाचा, LVM3 M4/Chandrayaan-3 Mission: चांद्रयान-3 भारताच्या अंतराळ ओडिसीमध्ये एक नवीन अध्याय लिहित आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)