CSK vs RCB, IPL 1st Match: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) आजपासून सुरू झाली आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात हाय व्होल्टेज सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत चेन्नई सुपर किंग्जने 20 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने 10 सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे नशीब जड असल्याचे दिसत आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तिसरा मोठा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्कोअर 41/3
Match 1. WICKET! Over: 5.3 Glenn Maxwell 0(1) ct MS Dhoni b Deepak Chahar, Royal Challengers Bengaluru 42/3 https://t.co/4j6FaLF15Y #TATAIPL #IPL2024 #CSKvRCB
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)