Ranji Trophy 2022: पदार्पणातच 19 वर्षीय Yash Dhull याचा धमाका, तामिळनाडू विरुद्ध ग्रुप सामन्यात ठोकले सलग दुसरे दणदणीत शतक
Ranji Trophy 2022: नारी कॉन्ट्रॅक्टर (1952/53) आणि विराग आवटे (2012/13) यांच्यानंतर रणजी करंडक पदार्पणाच्या प्रत्येक डावात शतक ठोकणारा भारताचा U19 विश्वचषक विजेता कर्णधार यश धुल फक्त तिसरा फलंदाज ठरला. पदार्पणातच दुहेरी शतकांसह यश धुल रणजी करंडक पदार्पणाच्या प्रत्येक डावात शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या एलिट यादीत सामील झाला आहे.
Ranji Trophy 2022: भारताचा अंडर-19 विश्वचषक विजेता कर्णधार यश धुल (Yash Dhull) रविवारी रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) इतिहासात पदार्पणाच्या दोन्ही डावात शतक ठोकणारा एकमेव तिसरा फलंदाज ठरला. गुवाहाटी येथील SCA स्टेडियमवर तमिळनाडू (Tamil Nadu) विरुद्ध दिल्लीच्या (Delhi) एलिट ग्रुप एच सामन्याच्या दुसऱ्या डावात दिल्लीच्या सलामी फलंदाजाने हा कारनामा केला. पदार्पणातच दुहेरी शतकांसह यश धुल रणजी करंडक पदार्पणाच्या प्रत्येक डावात शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या एलिट यादीत सामील झाला आहे.
A dream start! 👏 👏@YashDhull2002 becomes only the third player to score twin tons on #RanjiTrophy debut. 👍 👍 pic.twitter.com/kI5tBQ4Omd
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2022 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

