आज इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. जर राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकला तर ते पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवेल. त्याचबरोबर धोनीच्या संघालाही विजय मिळवून गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि पहिला मोठा धक्का बसला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा स्कोर 11/1.
Early strike for @ChennaiIPL, courtesy @TusharD_96! 👏 👏@IamShivamDube takes the catch 👍 👍#RR lose Yashasvi Jaiswal.
Follow the match ▶️ https://t.co/IgV0ZtiJJA#TATAIPL | #CSKvRR pic.twitter.com/Sx5OgCbJ55
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)